उंदीरवाडीत दिवसा घरफोडी; बारा तोळे सोन्यासह रोकड लांबवली

येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील उंदीरवाडी येथे शुक्रवारी सकाळी दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी बंदोबस्त भेदून सुमारे 10 ते 12 तोळे सोन्याचे दागिने आणि दोन हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, उंदीरवाडी येथील देशमुख वस्तीवर स्नेहल रुषाल देशमुख (वय 27, गरोदर महिला), त्यांची आई सिंधूबाई सोनवणे आणि काकू कल्पना सोनवणे या घरात होत्या. सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास एक
फेरीवाला घराजवळून गेल्यानंतर काही वेळातच दुचाकीवरून दोन अनोळखी इसम तेथे आले. महिला पाठीमागील बाजूस कामात असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी बेडरूममधील बॅगेतील व कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड चोरून दुचाकीवरून पोबारा केला. यावेळी घरातील पुरुष मंडळी दशक्रिया विधी व कामानिमित्त बाहेर गेले होते.
चोरट्यांनी आधीच रेकी केली होती का, तसेच फेरीवाल्याचा यात काही संबंध आहे का, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच येवला तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास
सुरू आहे.

Daytime burglary in Undirwadi; gold weighing twelve tolas and cash stolen.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *