‘वक्रतुंड’च्या गोविंदांनी फोडली दहीहंडी

गोंदेश्वर, शनैश्वर मंडळाच्या गोविंदा पथकांची चार थरांची सलामी

सिन्नर : प्रतिनिधी
ढोल-ताशांचा गजर, गोविंदा पथकांचा उत्साह अन् हंडी फोडण्यासाठी रंगलेली चुरस… अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दहीहंडी उत्सव पार पडला. शिवाजी चौक चॅरिटेबल ट्रस्टप्रणीत छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या उत्सवात वक्रतुंड प्रतिष्ठान, माकडवाडी येथील गोविंदा पथकाने पाच थरांचा मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडली आणि पारितोषिक पटकावले.
दहीहंडी फोडण्यासाठी शहरातील विविध गोविंदा पथकांनी जोरदार प्रयत्न केले. त्यापूर्वी गोंदेश्वर मित्रमंडळ आणि शनैश्वर मित्रमंडळाच्या गोविंदा पथकांनी प्रत्येकी चार थरांची सलामी देत उपस्थितांची दाद मिळवली. या पथकांनाही पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
उत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला. गोविंदा पथकांनी थर रचताना दाखवलेले कौशल्य आणि उत्साह पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे गटनेते मनोज देशमुख, मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे, उपाध्यक्ष नीलेश वाजे, खजिनदार पीयूष नवसे यांच्यासह सोनल नवसे, योगेश जाधव, योगेश शेजवळ, चेतन गुजराथी, ललित वैद्य, भूषण देशमुख, अमित जाधव, अमोल धनगर, सचिन वैद्य, अभिनय पेखळे, पंकज देशमुख, अजित गिते, सम्यक खिंवसरा, रोशन जाधव, सचिन बाकळे, ऋषी गोळेसर, तेजस देशमुख, प्रशांत शिंदे, सौरभ कोठुरकर, अंकुश देशमुख, गौरव देशमुख आणि प्रेम कोठुरकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोविंदा पथकांचा उत्साह, नागरिकांची गर्दी आणि ढोल-ताशांच्या गजरात दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला.

‘Vakratund’s’ Govindas broke the Dahi Handi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *