15 मिनिटांच्या काउंट पद्धतीने 20 प्रजातींच्या 150 फुलपाखरांची नोंद

नाशिक : प्रतिनिधी
’बिग बटरफ्लाय मंथ’निमित्त रविवारी (दि. 6) सिटिझन सायन्स नाशिक आणि अरन्यानी बायो कन्झर्वेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अनोख्या नेचर वॉकचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सहभागी तीन ग्रुपने ‘15 मिनिट काउंट मेथड’ या शास्त्रीय पद्धतीने फुलपाखरांची गणना केली. यावेळी 20 विविध प्रकारच्या तब्बल 150 फुलपाखरांची नोंद करण्यात आली.
फुलपाखरांचे संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि निसर्ग निरीक्षणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच फुलपाखरांच्या विविध प्रजातींची शास्त्रीय पद्धतीने नोंद व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. सहभागी नागरिकांना फुलपाखरांचे निरीक्षण, त्यांची ओळख आणि संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. ग्नेस खरात, डॉ. श्रीश क्षीरसागर, डॉ. विजय बर्वे आणि सतीश गोगटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप येथील फुलपाखरू उद्यानात करण्यात आला. या उपक्रमात डॉ. ग्नेस खरात, संजना काजवे, डॉ. श्रीश क्षीरसागर, डॉ. अदिती शेरे-खरवार, डॉ. विजय बर्वे, सतीश गोगटे, अनंत सरोदे, सीमा तांगडपल्लिवार, वेद शिंदे, अनिरुद्ध जाधव, कौस्तुभ मसूरकर, राजेंद्र कोतकर, अदिती कोतकर, पद्मजा ओतुरकर, संग्राम गोवर्धने, विजय कुलकर्णी, विनिता कुलकर्णी, मिलिंद पिटकर, श्रेयस द्विवेदी, अर्जुन सरोदे, श्रीमती सरोदे आणि हार्दिका यांनी सहभाग घेतला.
नाशिकमध्ये प्रथमच अशा प्रकारचा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आल्याने निसर्गप्रेमी व फुलपाखरू अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अनंत सरोदे आणि डॉ. अदिती शेरे-खरवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Unique nature walk in Nashik to mark ‘Big Butterfly Month’