नाशिक प्रतिनिधी
शहरात ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामांचा सपाटा सुरू आहे. रेड क्रॉस सिग्नल गावकरी प्रेस समोर स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ते खोदकाम सुरू आहे आज दुपारी दीड वाजता भूमिगत वीज कनेक्शनचे काम करीत असताना अचानक स्फोट झाला . या स्फोटात कर्मचाऱ्यांचा दोन्ही हात भाजले असून त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविले
घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी आणि स्मार्ट सिटी चे अधिकारी कर्मचारी गोळा झाले आणि नेमका स्फोट कशामुळे झाला याची विचारणा करण्यात आली
अचानक झालेल्या स्फोटामुळे धुराचा प्रचंड मोठा लोट तयार झाला आणि बघ्यांची गर्दी झाली काही काळासाठी वाहतूक खोळंबली आणि प्रचंड गर्दी झाली होती