केंद्राच्या ‘ ट्रान्सपोर्ट फॉर ऑल ‘ स्पर्धेत नाशिक पात्र

 

नाशिक : प्रतिनिधी
 शहराची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित , किफायतशीर व सुलभ होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आयोजित केलेल्या ‘ ट्रान्सपोर्ट फॉर ऑल ‘ स्पर्धेत नाशिक शहराने पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे . शहराची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित किफायतशीर व सुलभ होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या वतीने १५ एप्रिल २०२१ रोजी ‘ ट्रान्सपोर्ट फॉर ऑल ‘ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . नुकताच या स्पर्धेचा पहिला टप्पा पार पडला . त्यानुसार केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नुकतीच पहिल्या टप्यात पात्र शहरांची नावे दिल्लीत जाहीर केली . त्यानुसार पहिल्या टप्यात एकूण ४६ शहरे पात्र ठरले असून यात नाशिक शहराचा देखील समावेश आहे . नाशिक शहराने पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार करून शहर आता दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरले आहे . नागरिकांना उत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *