नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षण घेत असलेल्या परिचारिकेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. माधुरी काशिनाथ टोपले (वय 19)रा.वागणां ,ता. कळवण ,जि.नाशिक ही प्रशिक्षण केंद्र सिव्हिल हाॅस्पिटल येथे बुधवारी (दि.15) सकाळी 6.30 च्या दरम्यान राहत्या ठिकाणी गळफास घेतला.पंधरा ते वीस दिवसापूर्वी परिचारिका रजनी मिसाळने आत्महत्या केली होती. लागोपाठ घडणाऱ्या आत्महत्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.