सहा जण जेरबंद
सिडको : प्रतिनिधी
निमाणी आणि मेळा बसस्थानक परिसरात प्रवाशांचे मोबाइल चोरणार्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट-1ने पर्दाफाश केला. पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 3 लाख 32 हजार 500 रुपये किमतीचे विविध मोबाइल जप्त केले. या कारवाईत सरकारवाडा, नाशिकरोड आणि पंचवटी पोलिस ठाण्यांतील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमित हरिलाल महतो (40), सोहकुमार अरवा महतो (19), रोशनकुमार नेपाली महतो (20), सनीकुमार बाडीस महतो (18), मोहम्मद इतेसार आलम सलीम शेख (19) आणि रोहन अरवा महतो (21), अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. हे सर्व झारखंड राज्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरातील निमाणी व मेळा बसस्थानक परिसरात चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-1चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी पथक तयार केले. 29 सप्टेंबर रोजी पोलिस हवालदार देवीदास ठाकरे आणि पोलिस अंमलदार आप्पा पानवळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मेळा बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित सहा जण पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून 3 लाख 32 हजार 500 रुपये किमतीचे मोबाइल जप्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयितांनी नाशिक शहरातील सरकारवाडा, नाशिकरोड आणि पंचवटी परिसरात चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिस अभिलेख तपासल्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यासह नाशिकरोड आणि पंचवटी पोलिस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आल्याचे समोर आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीज शेख, राम शिंदे, किरण शिरसाठ, कैलाश चव्हाण, योगीराज गायकवाड, राजेश लोखंडे यांच्यासह पोलिस हवालदार देवीदास ठाकरे, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, रवींद्र आढाव, महेश साळुंके, संदीप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, रमेश कोळी, नादिमखान पठाण, उत्तम पवार, रोहिदास लिलके, मुश्रीफ शेख, गोरक्ष साबळे, धनंजय शिंदे तसेच पोलिस अंमलदार आप्पा पानवळ, राहुल पालखेडे, राम बर्डे, मुक्तार शेख, गणेश रूमाले, जगेश्वर बोरसे, सुनील भोसले, श्रीकांत सूर्यवंशी, अमोल कोष्टी, महिला पोलिस हवालदार शर्मिला कोकणी, मनीषा सरोदे, चालक सुकाम पवार, समाधान पवार आणि सेवानिवृत्त दत्तात्रय कडनोर यांनी केली.
Theft gang operating at Nimani and Mela bus stations busted.