पुणे : पुण्यातील औंध परिसरात पुणे पोलीस आणि सामाजिक सुरक्षा विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून चतुश्रृंगी पोलिस स्टेशनकडून या स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला आहे. यात सहा आरोपी असल्याची माहिती असून त्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून बाकी आरोपींचा शोध सुरु आहे. एका मॉडेलसह एकूण सहा पीडित महिलांची सुटका देखील करण्यात आली आहे.