दहावीला नापास झाल्याने खादगावी विद्यार्थ्याची आत्महत्या

मनमाड : प्रतिनिधी
दहावीच्या परीक्षेत एका विषयात नापास झाल्यामुळे खादगाव(ता.नांदगाव)येथील विद्यार्थ्याने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. या घटनेने शहर परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
खादगाव येथील सचिन लक्ष्मण ढेकळे (16) हा मनमाडच्या न्यू छत्रे हायस्कूलमध्ये शिकत होता.सर्व विषयात चांगले मार्क मिळाले मात्र इंग्लिशमध्ये कमी गुण मिळाल्याने तो नापास झाला. त्याला ही बाब सहन न झाल्याने तो नैराश्यात गेला. दुपारी 1.30 पासून शौचालयास चाललो सांगून गेला होता.घरी वडील नव्हते. ते घरी आल्यानंतर बराच वेळ तो घरी आला नाही. मग चौकशी सुरू केली असता विहिरीजवळ रिकामा डबा आढळून आला. 60 फूट विहिर असल्यामुळे व विद्युत पुरवठाही नसल्यामुळे जनरटेर लावून पाणी काढून मृतदेह बाहेर काढण्यात आला. रात्री उशिरा पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेने सर्वत्र हळहळ आणि दुःख व्यक्त केले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *