राशिभविष्य

शनिवार, १८ जून २०२२.

जेष्ठ कृष्ण पंचमी. ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे” आज दुपारी १.५० पर्यंत ‘वैधृती’ योग, त्यानंतर ‘विषकन्भ’ योग आहे.

चंद्रनक्षत्र – श्रवण (सकाळी ७.३९ पर्यंत) नंतर धनिष्ठा

मेष:- महत्वाची कामे आज संध्याकाळ नंतर पूर्ण करा. अधिकारात वाढ होईल. आरोग्य सुधारेल.

वृषभ:- प्रवास घडतील. कामानिमित्त वेळ द्यावा लागेल. मन आनंदी राहील. राजकीय मतभेद टाळा.

मिथुन:- अनामिक भीती दाटून येईल. ग्रहमान संमिश्र आहे. आरोग्य सांभाळा. संध्याकाळ नंतर परिस्थिती सुधारेल.

कर्क:- पूर्वार्ध अनुकूल आहे. कामे पूर्ण करा. प्रेमात यश मिळेल. आनंदी रहाल. स्वप्ने पूर्ण होतील. कायदेशीर सल्ला घ्या.

सिंह:- महत्वाची कामे आज सकाळी पूर्ण करा. उत्तम यश मिळेल. अकल्पित लाभ होतील. संध्याकाळ जोडीदार समवेत व्यतीत कराल.

कन्या:- आज नविन काहीतरी शिकायला मिळेल. उत्तरार्ध जास्त अनुकूल आहे. उपासना केल्यास लाभ मिळतील.

तुळ:- जवळचे मित्र भेटतील. सरकारी पाहुणचार घडेल. प्राण्यांपासून सावध रहा. दैवी उपासना आवश्यक आहे.

वृश्चिक:- पूर्वार्धात उत्तम लाभ होतील. मानसिक समाधान लाभेल. शत्रू पराभूत होतील. शेतीची कामे वेळीच मार्गी लावा.

धनु:- आर्थिक यश मिळेल. कौतुक होईल. कुटुंबास समजून घ्या. मन शांत ठेवा. कला प्रांतात चमक दाखवाल.

मकर:- कठोर भूमिका घ्याल. आप्त भेटतील. आर्थिक लाभ होतील. वक्तृत्व चमकेल.

कुंभ:- दिवसाची सुरुवात काहीशी संथ आहे. नंतर परिस्तिथी सुधारेल. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे.

मीन:- महत्वाची कामे संध्याकाळी ६ च्या आत पूर्ण करा. आर्थिक नियोजन काटेकोर करा. आरोग्य सांभाळा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *