दिंडोरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; मदत न मिळाल्यास उपोषण
दिंडोरी : प्रतिनिधी
पाण्याअभावामुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान आणि हवालदिल झालेला शेतकरी वर्ग… या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून भरपाई द्यावी, या मागणीसाठी संतप्त शेतकर्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. हातात आणि डोक्यावर वाळलेले भात, वरई व सोयाबीनच्या पिकांचे पेंढे धरून शेतकर्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. यासंदर्भात तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौफिक मणियार व माजी सरपंच संतोष रहिरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दिंडोरी हा आदिवासीबहुल तालुका असून, येथील सर्वसामान्य शेतकरी मुख्यत्वे पावसाच्या (वरच्या) पाण्यावरच अवलंबून असतो. मात्र, पावसाअभावी भातासह इतर पिके पूर्णपणे जळून नष्ट झाली आहेत.
आंदोलनात श्याम गवारे, गुलाब गायकवाड, योगेश कराड, संदीप भेरे, हिरामण गायकवाड, दशरथ शेखरे, छगन शेखरे, हरी शेखरे, कांतिलाल शेखरे, मुकुंदा शेखरे, माणिक शेखरे, विजय शेखरे, हनुमान शेखरे, काशीनाथ शेखरे, दौलत शेखरे, काशीनाथ गायकवाड, शंकर गायकवाड, कैलास गायकवाड, मोहन गायकवाड, हिरामण शिंदे, सोनीबाई गायकवाड, जयराम गायकवाड, देवीदास गायकवाड, मोतीराम शेखरे, धनराज माळेकर, विठ्ठल माळेकर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले
होते.
Farmers stage a sit-in protest with withered crops on their heads!