दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक

♦♦♦ सेंट्रल पार्क बंद
♦♦♦ 22 हजार जवान तैनात
♦♦♦ सुप्रीम कोर्ट म्हणाले-
      ‘शहाणपण दाखवा’

नवी दिल्ली : प्रतिनिधी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथे पुकारलेला ’लेहरा दो तिरंगा’ मार्च दिल्ली पोलिसांनी रोखला. सीजेपी संस्थापक अभिजित दीपके आणि एआयएसए नेत्या नेहा बोरा यांना सायंकाळी प्रतिबंधात्मक अटकेत घेण्यात आले. दिवसभरात दोन वेळा नोटीस, सेंट्रल पार्कला टाळे आणि 22 हजार जवानांचा वेढा, अशा नाट्यमय घडामोडी घडल्या.
दुपारी एकूणच घडामोडीबाबत सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली होती. कॅनॉट प्लेस व्यापारी संघटनेच्या याचिकेवर कोर्टाने, ’शहाणपण दाखवा’, असा सल्ला देत सणासुदीत दुकानदारांचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याचवेळी दिल्ली पोलिसांकडून दीपके यांना नोटीस बजावली गेली. कॅनॉट प्लेस हे आंदोलनासाठी अधिसूचित स्थळ नाही, तिथे आंदोलनाला परवानगी नाही, असे नोटिशीत म्हटले होते. तासाभराने दिपके यांना घरी जाऊन दुसरी नोटीस पोलिसांनी बजावली. 20 पोलीस दिपके थांबले तिथे, अनीश गावंडे यांच्या घरी, पोहोचले. दोन स्वतंत्र नोटिसा बजावल्या.
नोटिशीचा खेळ सुरू असतानाच, कनॉट प्लेस, राजीव चौक, जंतर मंतर परिसरात 6,000 दिल्ली पोलीस, 220 सीएएसएफ कंपन्या तैनात करण्यात आले. दिल्ली महापालिकेने आधीच सेंट्रल पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. अशात सायंकाळी पाचच्या सुमारास, दिपके तिरंगा घेऊन घराबाहेर पडताच पोलिसांनी त्यांना अडवले. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, कलम 163 लागू आहे, असे सांगत बळजबरीने पोलीस वाहनात टाकले. त्यानंतर अर्धा तासाने नेहा बोरा यांनाही अटक केली.
सरकार घबराट : सीजेपी
सरकार तरुणांना घाबरते. आम्हाला तिरंगा फडकवण्यापासून का रोखता?, असा सवाल दिपके यांनी व्हिडिओ मेसेजद्वारे केला. तिरंगा फडकवणे हा गुन्हा कसा? मुंबईतील आझाद मैदानात आम्हाला परवानगी मिळाली, मग दिल्लीत का नाही?, असा सवाल सीजेपीने केला. सीजेपी नेत्यांच्या सुटकेच्या आणि मतदार यादीतील एसआयआरमधील कथित ’वोट चोरी’च्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने हा तिरंगा मार्च पुकारला होता.

 

Delhi Police stopped the Tiranga Yatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *