नाशिक : प्रतिनिधी
योगा हा जीवन शैलीचा भाग बनत आहे. योगाचे महत्त्व लोकांना पटत आहे. परिणामी योगा करणार्यांची संख्या वाढत आहे. योगा हा दिन क्रमाचा एक भाग बनला आहे. जगभरात योगा शिकवण्यात येतो.योग करण्याचे वैद्यानिक आणि आरोग्यदृष्ट्या होणारे फायदे असंख्य आहेत.
योग करण्यामुळे शरीरासोबत मनाचा सदृढता वाढते.आजच्या काळात मन शांती मिळवण्यासाठी योगा उपयोगी ठरत आहे. त्यामुळे योगा शिक्षणात नवीन करिअरची संधी खुणावत आहे. योगाचे शिक्षण घेतल्यानंतर योग शिक्षक होता येते. अनेक मल्टी स्पेशालिटी रूग्णालयात नोकरीची संधी मिळू शकते.त्याचप्रमाणे योगा शिक्षण इन्स्टिट्यूट देखील काढता येऊ शकते. योगाची पदवी घेऊन योगाचे पुढील शिक्षण पुढील अभ्यास सुरू ठेवण्याची इच्छा नसली तरीही तो योग प्रशिक्षक होता येते. तसेच योगामध्ये संशोधन करता येऊ शकते. त्यामुळे योगा मध्ये करिअरच्या नवीन संधी उपलब्ध झाल्याने पारंपरिक करिअरला फाटा देत नवीन पर्याय अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.
योग शिक्षक होण्यासाठी पीजी डिप्लोमा कोर्स करण्याची पात्रता कोणत्याही क्षेत्रात किमान 50 टक्के गुणांसह पदवी अनिवार्य आहे. योगामध्ये पदवी अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. योग विज्ञानात बीएससी करता येऊ शकते.
मात्र यासाठी बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ज्यांना योग शिकायचा आहे. त्यांच्यासाठी 2 आणि 3 महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमदेखील आहेत.
काही नामांकित संस्था
मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग, नवी दिल्ली
वेबसाइट : ूेसरावपळू.पळल.ळप
प्रमाणपत्र अभ्यासक्रम कालावधी 3 महिने वर्ग : पात्रता : 12 वी, पीजी डिप्लोमा कोर्स कालावधी : 1 वर्ष, पात्रता : पदवी, पदवी अभ्यासक्रम कालावधी : 3 वर्षेपात्रता: 12 वी,
स्वामी विवेकानंद संस्था, बेंगळुरू
वेबसाइट: र्ीींूरीर.शर्वी.ळप योग प्रशिक्षक कोर्स कालावधी : 1 महिना ,पात्रता : 12 वी, बीएससी इन योगा कालावधी : 3 वर्षे,पात्रता : 12 वी
पीजी डिप्लोमा इन योगा थेरपी
कालावधी : 15 महिने, पात्रता : पदवी, एमएससी इन योगा पात्रता : पदवी कालावधी :2 वर्ष वेबसाइट: ुुु.लर्ही.रल.ळप
डिप्लोमा इन नेतरोपैथी अँड योगा
कालावधी : अडीच वर्षेपात्रता : 12 वी
आयपी विद्यापीठ वेबसाइट : ुुु.र्ळिी.रल.ळप/, बीएससी इन योगा कालावधी : 3 वर्षांची पात्रता : 12 वी
बिहार स्कूल ऑफ योगा
वेबसाइट : लळहरीळेसर.पशीं, सर्टिफिकेट कोर्स कालावधी: 2 व 4 महिने पात्रता : दहावी, पदविका अभ्यासक्रम कालावधी : 1 वर्ष पात्रता : 12 वी
योग विद्या धाम, नाशिक