महसूल आयुक्त कार्यालयावर मोर्चा

नाशिकरोड : प्रतिनिधी
वन अधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून सर्व अपात्र दावे पात्र करा, वन अधिकार कायद्यानुसार पात्र दावे दारांच्या कब्जेे वाहिवाटीस असलेली 4 हेक्टर पर्यंत जमीन मोजून त्याचा सातबारा करण्यात यावा, सात बाराला कबजेदारी सादरी लावा व ती जमीन वाहितीस योग्य आहे. असा शेरा मारावा. जुने अपूर्ण तलाव व लघु पाट बंधार्‍याच्या योजना पूर्ण कराव्यात. यासह विविध मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व नाशिक जिल्हा किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने सोमवारी (दि 20) महसूल आयुक्त कार्यालयावर कार्यालयावर मोर्चा काढला.
महसूल आयुक्त कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा येणार असल्याने नाशिकरोड परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. माजी आमदार जिवा पांडू गावित,डॉ डी, एल कराड,अशोक ढवळे, किसन गुजर,इरफान शेख,सुनील मालुसरे, भिका राठोड,सावळीराम पवार,रमेश चौधरी, डॉ देवराम गायकवाड,हनुमान गुंजाळ,अप्पा भोळे,सुवर्णा गांगुर्डे,वसंत बागूल,संजबाई खांबाईत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून धरणे धरण्यात आले. सकाळपासूनच महसूल कार्यालय परिसरात गर्दी जमू लागली होती. दरम्यान दुपारी साधारण तीन वाजेच्या दरम्यान आयुक्त कार्यलय व परिसर मोर्चेकर्‍यांच्या गर्दीने व्यापून गेला.
वनाधिकार काद्याची अंमलबजावणी 16 वर्षापासून सुरू आहे. परंतु सरकारने चुकीच्या पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे जिल्ह्यातील हजारो पात्र दावे अपात्र करण्यात आले. ज्याचे दावे पात्र झाले, त्यांना वनाधिकार कायद्यानुसार त्यांच्या ताब्यातील चार हेक्टर वनजमीन मंजूर झाली नाही. त्यांना एक गुंठा, दोन गुंठा जास्तीत जास्त दोन एकरपर्यंत जमीन मंजूर केली आहे. फॉरेस्ट प्लॉटधारकांची मागणी असताना सात-बारा उतार्‍यांवर त्यांचे नाव कब्जेदार म्हणून न लावता इतर हक्कात लावले आहे. एकाच सात-बारावर शेकडो प्लॉटधारकांची नावे टाकली आहेत. तसेच जिल्ह्यातील कांद्याला लागवडीच्या खर्चाच्या दीड पट भाव द्यावा, गरजू कुटुंबाना प्रधानमंत्री आवास घरकुल योजना तात्काळ मंजूर करून घराची किंमत 3 लाख करण्यात यावी. आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी दोन दिवसांपासून नाशिकरोड पोलीस ठाण्यात नियोजन करण्यात येत होते. त्यासाठी महसूल आयुक्त कार्यालय परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेटस लावण्यात आले होत.,मोर्चे कार्‍यांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे,उपायुक्त विजय खरात, सहा,पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्‍वर धुमाळ हे ठाण मांडून बसले होते. बंदोबस्त बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे ,पोलीस निरीक्षक गणेश न्याहाळदे,राजू पाचोरकर, वाहतूक शाखेचे धनराज पाटील यांना व त्यांच्या सहकार्‍यांन सूचना करीत होते. मोर्चासाठी सकाळी दहा वाजेपासूनच आदिवासी बांधव चारचाकी वाहनद्वारे आयुक्त कार्यालयाकडे येत होते,बिटको चौक ते द्वारका दरम्यान संपूर्ण रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र असाही परिस्थितीत स्थानिक पोलीस व वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *