अर्थखात्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अर्थखात्याची मागणी केली. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचा समावेश होता.
जानेवारी 2026 मध्ये विमान अपघातात दिवंगत झालेले अजित पवार यांच्याकडे हे खाते होते. सध्या ते मुख्यमंत्र्यांकडेच आहे. भुजबळ म्हणाले, की मुख्यमंत्री आमच्या मागणीबाबत सकारात्मक आहेत, पण तारीख ठरलेली नाही. आम्हाला फक्त अर्थखातेच हवे आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या.
महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असताना, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आमच्याकडून विषय थांबलेला आहे. कुठलाही प्रस्ताव नाही, असे स्पष्ट वक्तव्य भुजबळ यांनी केले.
दुसरीकडे, शरदचंद्र पवार गटाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कोअर कमिटीची बैठक घेऊन दुष्काळावर विचारमंथन केले. राज्यातील 358 पैकी 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून, शरदचंद्र पवार गटाने दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 25 हजार रुपयांची तातडीची मदत देण्याची आणि मुंबई-ठाण्यातील बांधकाम प्रकल्पांना पाणीपुरवठा तत्काळ बंद करून ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी देण्याची मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड व शशिकांत शिंदे यांनी धरणांचे पाणी राजकीय दबावाने वाटले जात असल्याचा आरोप केला आहे.

Chief Minister’s request for Finance Ministry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *