उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्‍यावर

नाशिक : प्रतिनिधी
समांतर गंगापूर रोड अर्थात स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग या महत्त्वाकांक्षी कॅनॉल रोड प्रकल्पाचे भूमिपूजन आज, सोमवारी (दि. 26) उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यासह त्यांच्या नाशिक दौर्‍यात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे, अशी माहिती उपमहापौर विलास शिंदे यांनी दिली. या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज (दि. 26) दुपारी 2 वाजता गंगापूर रोड परिसरातील तिरुमला हाइट्स, पाइपलाइन रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नाशिक दौर्‍याची सुरुवात सकाळी 10 वाजता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने होणार आहे. यावेळी साधू-संत-महंतांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता हरसूल येथे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दीपावलीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल. दुपारी 2 वाजता समांतर गंगापूर रोड प्रकल्पाचे भूमिपूजन, तर दुपारी 3 वाजता मविप्र संस्थेच्या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde is on a visit to Nashik today.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *