नाशिक घाटमाथ्यावर आज पावसाची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी
अर्णब चक्रीवादळाच्या प्रभावातून, मंगळवारी राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने (आयएमडी) बुधवारीही (दि. 28) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. मात्र, काही जिल्ह्यांमद्ये वादळी वार्‍याच्या आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये हवामान कोरडे राहणार आहे.
नाशिकच्या घाटमाथा परिसरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे धुळे, नंदुरबार आणि जळगाव याठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येऊ शकतो. दरम्यान, अर्णब चक्रीवादळ बुधवारी सकाळी आंध्र प्रदेश किनार्‍यावर धडकणार असून, अनेक राज्यांत हवामान बदललेले आहे. जोरदार वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक राज्यांना सावधानतेचा इशारा जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड इथे हवामान कोरडे राहणार आहे. रत्नागिरीमध्ये मात्र मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Rain likely in the Nashik mountain pass (ghat) region today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *