राशिभविष्य

बुधवार, २२ जून २०२२,

जेष्ठ कृष्ण, नवमी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

“आज उत्तम दिवस आहे ” आज ‘शोभन’ योग आहे.

चंद्रनक्षत्र: रेवती, मीन राशी

मेष:- आज त्रास संभवतो. आपत्ती येऊ शकते. सरकारी कामात घोळ नको. वाहन जपून चालवा.

वृषभ:- कामे मार्गी लागतील. स्वप्ने साकार होतील. वाहनसुख मिळेल. कष्टाचे चीज होईल.

मिथुन:- कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. सौख्य लाभेल. प्रगतीचा वेग वाढेल.

कर्क:- राजकारणाचा त्रास होईल. गैरसमज होतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

सिंह:- आज काळजी घेण्याचा दिवस आहे. आरोग्य सांभाळा. वाहन अतिशय जपून चालवा. वाद टाळा.

कन्या:- हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून त्रास संभवतो. चोरीचे भय आहे. घरात चिडचिड नको.

तुळ:- अधिकाराचा योग्य वापर कराल. आर्थिक लाभ होतील. प्रगती होईल. स्पर्धेत यश मिळेल.

वृश्चिक:- प्रवास घडतील. वक्तृत्व गाजवाल. विरोधक पराभूत होतील. मत्सर त्रास जाणवेल.

धनु:- राहत्या जागेजवळ वादविवाद होऊ शकतात. क्रोध आवरा. नोकरांशी संवाद साधावा लागेल.

मकर:- आर्थिक प्रगती चांगली असणार आहे. मात्र जपून पावले टाका. चुकीचे निर्णय होऊ शकतात.

कुंभ:- कठोर बोलण्याने माणसे दुरावतील. संयम ठेवावा लागेल. निर्णय घेताना घाई करू नका.

मीन:- अति आत्मविश्वास टाळावा. कमी बोलावे. नम्रता बाळगा.

ज्योतिषी  मंगेश पंचाक्षरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *