लासलगाव : प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे एका माथेफिरु युवकाने आपल्याच आई आणि वडिलांना मारहाण करीत त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
माथेफिरू युवकाचे नाव दत्तू रामदास सुडके असून कुटुंबात होणा-या भांडणातून त्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. माथेफिरु युवकाने केलेल्या मारहाणीत रामदास आणाजी सुडके आणि त्यांच्या पत्नी सरूबाई रामदास सुडके या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पथक घटनास्थळी पोहचले आहे.