कुंभथॉन

– योगिनी पैठणकर

नाशिक येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. आपणा सर्वांना त्याची माहिती आहे. पण तरुण पिढीचा या सोहळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असेल तो योग्य की अयोग्य, उपयुक्त किंवा उपयुक्त नाही, हे आता मी सांगणार नाही. कारण या सिंहस्थात तरुण पिढीला काय संधी, उद्योग आणि अर्थार्जनाला, पर्यावरणाला पूरक, पोषक काय करता येईल हे मात्र ठरवता येईल.
सन 2000 च्या पुढच्या सगळ्या पिढीला पहिल्यांदाच समजुतदारीने कुंभमेळा पाहायचा आहे. अनुभवायचा आहे. मागचा कुंभ या पिढीला न कळण्याइतपत होता. शाहीस्नान, ध्वजारोहण तपोवन मेळा वगैरे शब्द फक्त ऐकीवात होते. आज त्याचा खरा अर्थ कळतोय. शाहीस्नान, झाल्यावर खर्‍या अर्थाने सिंहस्थ सुरू होतो. पण यावेळी समाजमाध्यमं बरीच अग्रेसर आहेत.. आपल्या वेळी सोशल मीडिया अग्रेसर नव्हता. आपण जे बघायचो, ऐकायचो, वाचायचो तेच खरं वाटायचं! तेच खरं मानलं जायचं, लोकं करतात, मानतात आपणही करायला हवं. पण आता तरुण पिढी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून वावरते! स्वतःच्या वागण्याचा, कामाचा शहानिशा करतेय. काय योग्य काय अयोग्य हे त्यांना कळत आहे! सध्याचं कॉकरोच जनता पार्टी किंवा बापट प्रकरण समोर आहेच! त्यामुळे ती पिढी वास्तव शोधते, कारण धार्मिक गोष्टी, परंपरा, आध्यात्म, विद्या, विज्ञान अर्थार्जन आणि कमी वेळेत अनेक गोष्टी मल्टीटास्कींग करून ती शहानिशा करते… व वेळ सत्कारणी लावते. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक मिनिटाला ती पिढी अपडेट होते! जुने सर्व चांगले आहे असेही ते मानत नाहीत किंवा जुनं टाकायचं असेल तेही त्यांना पटत नाही! फक्त ते बुद्धिवादी होऊन विचार करताय नि त्यात काहीही गैर नाही..!
जरी आपण असं समजले की 2015 मध्ये वीस लाख भाविक होते, तरी यावेळी एक कोटी किंवा अधिक लोक येतील असा अंदाज आहे, पण हे सगळं निभवायला आपली पिढी किंवा नाशिककर सक्षम आहेत का? त्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त करणे खरंच गरजेचं आहे. त्याठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक लोकं येतील किंवा ज्या मंदिरांमध्ये गर्दी होईल, स्नानाला लोटालोटी होईल जसे श्री काळाराम मंदिर, भद्रकाली, सांडव्यावरची देवी, पंचवटीतील काही मंदिरे आहेत, तेथे भाविकांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. त्या लोकांनी, तसेच माध्यम स्वरूपात पोलिसांनी, तरुण मुलांनी वेगवेगळ्या प्रकारे मदत करायला हवी. आपण या प्रकारात सर्वतोपरी सहभाग घ्यायलाच हवा.
(क्रमशः)

Kumbhathon

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *