– सुप्रिया सुरवाडे
सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती…? या शुष्क होत जाणार्या जगात…कोरड्या संवेदना घेऊन जगणार्या जगात….काय हवंय माणसाला…? घर, गाडी…? बंगला…? संपत्ती…? कदाचित हो पण त्याहीपलीकडे माणूस शोधत असतो… एक असा कोपरा जो त्याचा हक्काचा असेल….ऐकणारे कान…..आणि एक सुंदर हृदय जे त्याच्या भावना समजून घेईल…..कुठलीही प्रतिक्रिया न देता….कुठल्याही प्रकारे त्याला न तोलता मोलता फक्त आणि फक्त ऐकून घेणारं…. मग ती व्यक्ती असेल… एखादी सुंदर जागा असेल… काहीही…. पण विशेषतः व्यक्तीच…
काल एक फार सुंदर ओळ वाचण्यात आली… एखादी सांगणारी, व्यक्त होणारी व्यक्ती असेल… ती काही सांगत असेल… तर फक्त शांतपणे ऐकून घ्या… त्या व्यक्तीला तिथे कुठल्याही शब्दांची, तुमच्या उपदेशाची गरज नसते… फक्त ऐकणारे कान आपल्याला व्हायचं असतं… आणि खर सांगू खूप भाग्यवान आणि शक्तिशाली व्यक्ती आहेत त्या व्यक्ती, ज्या समोरच्या व्यक्तींच ऐकून घेऊ शकता, त्या हृदयाच्या वेदना समजून घेऊ शकतात… कुणाचा तरी आधार होता आलं… यापेक्षा दुसर काहीच नाही… एखाद्याचा आधाराचा खांदा होता आलं…. खूप झालं…. आजच्या या शुष्क जगात माणूस प्रेमाचा ओलावा , आपुलकीचा हात, हृदय जपणारी, भावना सांभाळणारी, संवेदना जाणून घेणारी व्यक्ती शोधत असतो… आणि याचीच आज कमी सर्वत्र पाहायला मिळते आहे…. म्हणून तर न सांगता बोलता व्यक्ती निघून जातात…. ऐकणारे कान भेटत नाहीत… जग म्हणजे प्रेमावर, आपुलकीवर जगत… त्याचाच शोध प्रत्येकाला असतो.. कोणी प्रेमाने विचारपूस केली तरी किती भारी वाटत… कोणी सहज म्हणलं काळजी घ्या… आम्ही आहे… तरी मनाला समाधान मिळतं…. हे कुठल्या पैशात नाही मिळत…. शेवटी माणूस आहे माणसाची अपेक्षा करणारच…. समजून घेऊया, प्रेम वाटूया…. कुणाचा तरी ऐकणारा कान… आणि आधाराचा खांदा होऊया… आणि विशेष स्वतःच प्रेम होऊया कारण आपण स्वतःच प्रेम स्वरूप आहोत याचा विसर नको पडायला…
Listening ears…