नाशिक जिल्ह्यातील 4.17 लाख शेतकर्यांना लाभ
नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने दिवाळी अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील 18 लाख 7 हजार 32 शेतकर्यांच्या बँक खात्यांत 903 कोटी 52 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 4 लाख 17 हजार 649 शेतकर्यांना 208 कोटी 82 लाख रुपयांची मदत मिळाली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्या शेतकर्यांना दिवाळीच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
नाशिक विभागातील अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या पाच जिल्ह्यांत मदतीचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक 8 लाख 7 हजार 284 शेतकर्यांना 403 कोटी 64 लाख रुपये मिळाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील 4 लाख 8 हजार 635 शेतकर्यांच्या खात्यात 204 कोटी 32 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील 4 लाख 17 हजार 649 शेतकर्यांना 208 कोटी 82 लाख रुपये वितरित झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील 65 हजार 930 शेतकर्यांना 32 कोटी 97 लाख रुपये, तर नंदुरबार जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 534 शेतकर्यांना 53 कोटी 77 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विभागातील लाखो शेतकर्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक हातभार मिळाला आहे. शेतीतील अडचणी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेला आर्थिक ताण काही प्रमाणात कमी करण्यास या मदतीचा उपयोग होणार आहे.
जिल्हानिहाय मदतीचे वितरण
जिल्हा शेतकरी मदत
अहिल्यानगर 8,07,284 403.64 कोटी
जळगाव 4,08,635 204.32 कोटी
नाशिक 4,17,649 208.82 कोटी
नंदुरबार 1,07,534 53.77 कोटी
धुळे 65,930 32.97 कोटी
एकूण 18,07,032 903.52 कोटी
तालुकानिहाय लाभार्थी
मालेगाव 71417
निफाड 55245
येवला 51663
बागलाण 49107
सिन्नर 47166
नांदगाव 35,572
चांदवड 24,708
देवळा 22,546
कळवण 19,546
इगतपुरी 14339
सुरगाणा 10,341 त्र्यंबकेश्वर 9148
पेठ 6817
Diwali sweet for 18 lakh farmers in the region due to advance