इंदिरानगर |वार्ताहर
बस चालकाचा ताबा सुटल्याने रोड लगत चालू असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी बस जाऊन आदळली.
कंपनी कामगारांची वाहतूक करणारी बस पाथर्डी रस्ताने धावत होती. पाथर्डी गावाच्या सर्कल च्या मागे रिद्धी सिद्धी अपार्टमेंट समोर रोडच्या खाली बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी जाऊन आदळली आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे . सुदैवाने बस मध्ये कोणीही नव्हते. बस मध्ये प्रवासी असते तर मोठी दुखापत होण्याची शक्यता होती. बस चालकाला देखील कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.