राशिभविष्य

२४ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर शुक्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही एक हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती आणि कलाकार असतात. तुमच्या कलेतून तुमचे आर्थिक प्राप्ती होते. समाजात येणे जाणे असते. नवीन योजना राबवण्याची घाई होते. मित्रांबद्दल प्रेम असते. श्रीमंत जोडीदार मिळतो आणि लग्नानंतर भाग्योदय होतो. तुम्ही कायदाप्रेमी आहात. पाण्याजवळ भाग्योदय होतो. तुमच्यात कर्तृत्व आहेमात्र काही विलक्षण घटना आयुष्यत घडतात. वयाच्या 34 व्या वर्षी उत्कर्ष होतो. स्वतंत्र विचार असल्याने प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हातात असावी असे तुम्हाला वाटते. अंतर्गत आवाजाची तुम्हाला देणगी आहे. तुमचे असणे इतरांना आवडते. तुम्ही इतरांना सहजासहजी समजून येत नाहीत. रूढी, परंपरा यांची बंधने तुम्ही पाळत नाहीत. स्वतःबद्दल तुम्हाला कमालीचा आत्मविश्वास असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घेतात. तुम्ही बोलण्यामध्ये अत्यंत चलाख आहात. जीवनात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळतो. तुमचे आयुष्य आरामदायक जाते. तुमचे कपडे उच्च दर्जाचे असतात. आणि तुम्ही सुगंधी द्रव्य वापरतात. तुमचा स्वभाव संशयी आहे. उच्च वर्तुळात तुम्ही रमतात.

व्यवसाय:- संगीतकार, सराफ, व्यापार, हॉटेल मॅनेजमेंट, बेकरी, आर्किटेक्ट, मेडिकल दुकान, शेअर ब्रोकर, कमिशन एजंट, इस्टेट ब्रोकर.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- गुलाबी, निळा.

शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा.

शुक्रवार, २४ जून २०२२.

जेष्ठ कृष्ण एकादशी. दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभनाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

“आज चांगला दिवस *योगिनी एकादशी*” आज ‘सुकर्मा’ योग आहे.

चंद्रनक्षत्र – अश्विनी/भरणी.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनपेक्षित लाभ होतील. स्पर्धा जिंकाल. मन प्रसन्न राहील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) खर्चाचे नियोजन व्यवस्थित करा. प्रलोभने टाळा. विनाकारण खर्च होऊ शकतो.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. चैनीवर खर्च कराल. अधिकारात वाढ होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. प्रवास घडतील. सूचक घटना घडतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मात्र कामाचा ताण वाढेल. एखादी सुखद घटना घडेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रेमी जनांना यश मिळेल. शुभसमाचार समजतील. मन प्रसन्न राहील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. मौल्यवान खरेदी होऊ शकते.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धाडसी निर्णय घ्याल. प्रेमात यश मिळेल. योग्य पद्धतीने व्यक्त व्हाल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक आवक चांगली राहील. चैनीवर खर्च कराल. मौल्यवान खरेदीचे बेत आखाल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभाचा दिवस आहे. कला प्रांतात चमक दाखवाल. गायकांना अनुकूल कालावधी आहे.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *