रस्ता झाला खोल, चेंबरचा झोल

गंगापूर रोडवर वाहने चालवणार्‍यांची पंचाईत

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे रूप पालटत असून, रात्रीचा दिवस करून रस्त्यांची कामे केली जात आहेत. गंगापूररोडच्या रुंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, हे काम करताना रस्त्याच्या मध्यमागी असलेले चेंबर रस्त्यापेक्षा उंच झाल्याने या चेंबरवरून वाहने चालवायची कशी? असा प्रश्न वाहनधारकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदाराला वेळीच समज देऊन चेंबर समांतर रस्त्यात न बनविल्यास डांबरीकरण करूनही त्याचा उपयोगच होणार नसेल तर खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.
गंगापूररोडचे सध्या काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात असताना रस्त्यातील अनेक अडथळे ‘जैसे थे’ आहेत. भोसला मिलिटरी महाविद्यालयाजवळील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, रस्त्यात असलेले चेंबर हे रस्त्याच्या मध्यमागीच उंच झाले आहे. त्या चेंबरवरून वाहन चालविणे धोकादायक तर आहेच, शिवाय रात्रीच्या वेळी चेंबर लक्षात न आल्यास दुचाकीस्वाराचा अपघात होऊ शकतो. अशीच परिस्थिती बेंडकुळेनगरच्या पुढील वळणावर आहे. सोमेश्वर मंदिराच्या पुढील रस्त्याच्या कडेला असलेले चेंबर रस्त्यापेक्षा उंच झाले आहेत. चेंबरभोवती डांबरीकरण करून ठेकेदार मोकळा झाला आहे. परंतु, चेंबर रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आनंदवल्ली सिग्नलजवळही रस्त्यातील चेंबर रस्त्यापेक्षा उंच आहेत. चेंबरभोवती डांबरीकरण करून रस्ता रुंद करण्याचा खटाटोप केला जात आहे.

Road turned into a deep pit; the manhole cover is a mess.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *