महापरिनिर्वाण दिनासाठी नाशिकरोडमार्गे विशेष रेल्वे

नागपूर, अमरावतीहून 4 ते 8 डिसेंबरदरम्यान धावणार अनारक्षित रेल्वे

नाशिकरोड विशेष : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-मुंबई सीएसएमटी, मुंबई-नागपूर, तसेच अमरावती-मुंबई मार्गावर या अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहेत. त्यांना नाशिकरोड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 4 ते 8 डिसेंबरदरम्यान या गाड्या विविध तारखांना धावणार आहेत.
अमरावती-मुंबई विशेष गाडी
अमरावती-मुंबईदरम्यानही विशेष अनारक्षित रेल्वे धावणार आहे. गाडी क्रमांक 01218 ही 5 डिसेंबरला अमरावतीहून सायंकाळी 5.45 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 5.25 वाजता मुंबईला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01217 ही 7 डिसेंबरला मध्यरात्री 12.40 वाजता मुंबईहून सुटून त्याच दिवशी दुपारी 12.50 वाजता अमरावतीला पोहोचेल.
या विशेष गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर आदी प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. अमरावती-मुंबई विशेष गाडीला शेगाव व पाचोरा यांसह मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. या सर्व विशेष गाड्यांना सोळा सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन अशी रचना असेल. गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती प्रवाशांना भारतीय रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

Special train via Nashik Road for Mahaparinirvana Day

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *