अवघ्या तीन तासांतच जेरबंद करण्यात पथकाला यश
सातपूर : प्रतिनिधी
ठक्कर डोम परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी अशोकनागर भागात शौचालयाच्या पोटमाळ्यावर बिबट्या बसल्याचे आढळून आला होता,,या बिबट्याला जेरबंद करण्यात वन्य जीव विभागाला यश आले आहे
पंढरीनाथ काळे यांच्या घराबाहेरील शौचालयाच्या पोट माळ्यावर बिबट्या बसलेला होता, भरवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक हादरले होते,, वनविभागाला कळवण्यात आल्या नंतर तातडीने रेस्क्यू टीम याठिकाणी दाखल झाली, बिबट्या ला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन्यजीव विभागाच्या पथकाला यश आले आहे,
पाहा व्हिडिओ