शुक्रवार, ८ जुलै २०२२.
आषाढ शुक्ल नवमी. ग्रीष्म ऋतू. दक्षिणायन. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज उत्तम दिवस आहे” आज सकाळी ९.०० पर्यंत ‘शिव’ योग आहे. त्या नंतर ‘सिद्ध योग आहे.’
चंद्र नक्षत्र – चित्रा (दुपारी १२.१३ पर्यंत)
मेष:- महत्वची कामे आज पूर्ण करा. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात. भागीदारी व्यवसायात वाद होऊ शकतात.
वृषभ:- उत्तम यश मिळेल. कामे मार्गी लागतील. वाहन किंवा यंत्र यापासून धोका संभवतो.
मिथुन:- उत्तम दिवस आहे. कामे मार्गि लागतील. येणी वसूल होतील. कठोर भूमिका घ्या.
कर्क:- कामाच्या ठिकाणी विरोध सहन करावा लागेल. हितशत्रू डोके वर काढतील. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. प्रवासात अडथळा येईल.
कन्या:- सखोल विचार कराल. मान सन्मान मिळतील. आरोग्य सांभाळा. वाहन जपून चालवा.
तुळ:- आत्मविश्वास वाढेल. मात्र तो अति नको. जोडीदाराशी मतभेद संभवतात. कामात दगदग होईल.
वृश्चिक:- धनलाभ होईल मात्र काही कायदेशीर कटकटी निर्माण होऊ शकतात. खर्चात वाढ होईल.
धनु:- उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराकडून फायदा होईल.
मकर:- अधिकारात वाढ होईल. मात्र कामाच्या ठिकाणी वादविवाद होऊ शकतात.
कुंभ:- सरकारी कामातून लाभ होतील. सौख्य लाभेल. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील.
मीन:- जोडीदार खुश होईल. कालावधी चांगला आहे. गैरसमज टाळा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –