नाशिक प्रतिनिधी
दोन कुत्र्यांच्या भांडणात चुलीवर ठेवलेल्या पातेल्यातील गरम पाणी अंगावर पडून दोन चिमुकल्या भाजले ची घटना गिरणारे जवळील देवरगाव येथे घडली या दोन्ही चिमुकल्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सकाळी आंघोळीसाठी पाणी पातेल्यामध्ये तापत ठेवले होते याच वेळी बाहेरील कुत्रा व घरातील कुत्रा यांची झुंबड उडाल्याने चुलीवरील गरम पाण्याचे पातेले खाली पडल्याने गरम पाणी अंगावर उडाल्याने दोन बालिका भाजल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूपाली कराटे आणि पल्लवी कराटे अशी या बालिकांची नावे आहेत यातील एक बालिका 60 ते 70 टक्के भाजली आहे.