स्वराजित संगीत अकॅडमीतर्फे गुरुवारी गाने सुहाने मैफल

नाशिक : प्रतिनिधी
स्वराजित संगीत अकॅडमी प्रस्तुत एक अनोखी गुरुवंदना गाने सुहाने ही सदाबहार गाण्याची मैफल गुरुवार दिनांक 28 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रावसाहेब थोरात सभागृह येथे होणार आहे. रागिणी कामतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होणार्‍या या मैफलीत श्रुती वैशंपायन, श्रीशा जुनागडे, प्राजक्ता बागड, लक्ष्मी अपशंकर, डॉ. आरती चिरमाडे, डॉ. पूनम वराडे, सोनाली चौधरी, स्वाती पाचपांडे, गायत्री भांडारी, सुनीता शिरोडे,डॉ. सुप्रिया जोशी, डॉ. अर्चना वरे आदींच्या सहभागाने ही मैफल सजणार आहे. रागिणी कामतीकर यांच्याकडून संगिताचे व गायनाचे धडे घेतलेल्या या सर्व कलाकार आपली गायन कला सादर करुन अनोखी गुरुवंदना देणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

One thought on “स्वराजित संगीत अकॅडमीतर्फे गुरुवारी गाने सुहाने मैफल

  1. स्वराजित संगित अकादमी ची अधिक माहिती हवी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *