सिडकोतील युवकाचा रामशेज किल्ल्यावर ह्रदयविकाराने मृत्यू

 दिडोरी : प्रतिनिधी
नाशिक (सिडको) शिवपुरी चौकातील वीस वर्षीय युवकाचा दिंङोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्यावर हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजय सरोवर (वय २०) मृत युवकाचे नाव आहे.   याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोतील उत्तमनगर परिसरातील शिवपुरी चौकात राहणारे नारायण सरोवर हे काल (दि.३०) रोजी सकाळी रामशेज किल्ल्यावर कुटुंबियां समवेत गेले होते. किल्ल्यावर गेल्यावर त्यांचा मुलगा अजय सरोवर (वय २०) चक्कर येऊन पडला. त्यानंतर त्याला तात्काळ  नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.  अजय हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचे वडील नारायण सरोवर यांचा फळे विक्रीचा व्यवसाय आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *