नाशिक

द्वारका चौकात कळंबोलीच्या धर्तीवर पूल उभारावा

ना. नितीन गडकरी : वाहतूक कोंडीबाबत नागपूरला बैठक

नाशिक : प्रतिनिधी
द्वारका येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील परिस्थितीचा अभ्यास करून कळंबोलीच्या धर्तीवर पूल बांधण्याचे आदेश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिले.
नाशिक येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थाच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गासंदर्भात करावयाच्या सुधारणांच्या बाबत नागपूर मुख्यमंत्री सचिवालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदामंत्री व सिंहस्थ मंत्री गिरीश महाजन, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार देवयानी फरांदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी आगामी सिंहस्थापूर्वी द्वारका येथील उड्डाणपुलाचे काम करणे गरजेचे आहे, असे नमूद केले. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी उपस्थित असणारे एमएसआरडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीक्षित व मुख्य अभियंता हांडे यांना द्वारका सर्कलचा अभ्यास करून कळंबोलीच्या धर्तीवर पूल तयार करण्याचे आदेश दिले. तसेच छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी द्वारका सर्कलच्या अलीकडे एक्झिट दिले आहे. त्यानंतर कुठेही एक्झिट दिलेले नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी सर्व वाहतूक ही द्वारका सर्कलमार्गे जाते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी व छ. संभाजीनगरहून येणार्‍या वाहनांसाठी द्वारका सर्कलनंतर छ. संभाजीनगर नाक्यापर्यंत उड्डाणपुलावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी नवीन मार्ग करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. द्वारका येथील अंडरपास पादचारी मार्ग हे कोणत्याही प्रकारच्या उपयोगाचे नसल्याने बंद करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्पाधिकारी ढगे यांना याबाबत पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश नितीन गडकरी
यांनी दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, महापालिका शहर अभियंता संजय अग्रवाल आदींसह मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भुयारी मार्ग निरुपयोगी असल्याने तो बंद करावा, अशी मागणी आ. देवयानी फरांदे यांनी केली. यावर ना. नितीन गडकरी यांनी यासंदर्भात अहवाल देण्यास सांगितले आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

11 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

11 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

11 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

12 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

12 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

12 hours ago