format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 13107200;cct_value: 0;AI_Scene: (11, 0);aec_lux: 131.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 31;
ना. नितीन गडकरी : वाहतूक कोंडीबाबत नागपूरला बैठक
नाशिक : प्रतिनिधी
द्वारका येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील परिस्थितीचा अभ्यास करून कळंबोलीच्या धर्तीवर पूल बांधण्याचे आदेश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिले.
नाशिक येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थाच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गासंदर्भात करावयाच्या सुधारणांच्या बाबत नागपूर मुख्यमंत्री सचिवालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदामंत्री व सिंहस्थ मंत्री गिरीश महाजन, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार देवयानी फरांदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी आगामी सिंहस्थापूर्वी द्वारका येथील उड्डाणपुलाचे काम करणे गरजेचे आहे, असे नमूद केले. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी उपस्थित असणारे एमएसआरडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीक्षित व मुख्य अभियंता हांडे यांना द्वारका सर्कलचा अभ्यास करून कळंबोलीच्या धर्तीवर पूल तयार करण्याचे आदेश दिले. तसेच छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी द्वारका सर्कलच्या अलीकडे एक्झिट दिले आहे. त्यानंतर कुठेही एक्झिट दिलेले नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी सर्व वाहतूक ही द्वारका सर्कलमार्गे जाते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी व छ. संभाजीनगरहून येणार्या वाहनांसाठी द्वारका सर्कलनंतर छ. संभाजीनगर नाक्यापर्यंत उड्डाणपुलावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी नवीन मार्ग करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. द्वारका येथील अंडरपास पादचारी मार्ग हे कोणत्याही प्रकारच्या उपयोगाचे नसल्याने बंद करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्पाधिकारी ढगे यांना याबाबत पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश नितीन गडकरी
यांनी दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, महापालिका शहर अभियंता संजय अग्रवाल आदींसह मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भुयारी मार्ग निरुपयोगी असल्याने तो बंद करावा, अशी मागणी आ. देवयानी फरांदे यांनी केली. यावर ना. नितीन गडकरी यांनी यासंदर्भात अहवाल देण्यास सांगितले आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…