चांदवड : वार्ताहर
तालुक्यातील पारेगाव येथे एका 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. पारेगाव येथील किसन रघुनाथ बागूल यांच्या शेत गट नंबर 151 मधील विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याची माहिती शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास भवर यांनी रविवारी (दि. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास वनविभागाला दिली.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनमंडळ अधिकारी अजय शिंदे, वनरक्षक वाल्मीक वरगळ, विजय टेकर, वनसेवक भरत वाघ, वसंत देवरे, शफिक सय्यद, वाहनचालक अशोक शिंदे व रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी 60 ते 70 फूट खोल विहिरीत वन कर्मचार्यांनी क्रेनच्या सहाय्याने पिंजरा सोडला आणि अथक प्रयत्नांनंतर बिबट्याच्या बछड्याला सुखरूप बाहेर काढले. या यशस्वी बचावकार्यामुळे वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेचे आणि सहकार्याचे महत्त्वपूर्ण योगदान दिसून आले.
एक लाख सत्तर हजारांच्या लाचेची मागणी इगतपुरी नगरपरिषदेचे तीन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात नाशिक: प्रतिनिधी सीसीटीव्ही…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यात सोमवारी (दि.12) दुपारनंतर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटांसह अवकाळी…
नाशिक : प्रतिनिधी भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत शस्त्रसंधी झाली असली, तरी संरक्षण विभागातर्फे संरक्षणाची सर्व प्रक्रिया…
अतिरिक्त आयुक्त नायर : गोदावरी उपसमितीच्या बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी गोदावरी व तिच्या उपनद्या…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्राला जशी सांस्कृतिक परंपरा आहे तसेच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, ती…
येवला तालुक्यात एन्झोकेमच्या पहिल्या पाचमध्ये विद्यार्थिनीच नाशिक ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक…