त्र्यंबकेश्वर :प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे बस स्थानकाच्या शेजारी मध्यवस्तीत कार पेटवल्याने त्र्यंबक नगरी हादरली आहे. शुक्रवारच्या पहाटे 2 वाजता हनुमान प्रासदिक मंडळाच्या जागेत उभी असलेली कार अज्ञात इसमानी पेटवली, विशेष म्हणजे गगनगिरी आश्रम भक्त निवास आहे. तेथे शेकडो भाविक वास्तव्यास होते. तसेच पाच लॉजिंग आहेत. पेटलेल्या वाहनाच्या इंधन टाकीचा स्फ़ोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मागच्या काही दिवसात या जागेबाबत किरण चौधरी आणि हनुमान मंडळाचे विश्वस्त यांच्यात वाद आहेत. याबाबत त्र्यंबक पोलिसांत तक्रारी दाखल आहेत. नागरिकांनी भर वस्तीत घडलेल्या प्रकाराबाबत भीती व्यक्त केली आहे.
पहा व्हीडिओ