नाशिक

रुई येथील उपसरपंच व पतीवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

 

लासलगाव : समीर पठाण

रुई ता.निफाड येथील उपसरपंच महीला व त्यांचे पती यांनी वीज वितरण कर्मचाऱ्यास मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी देवगावचे सहा.अभियंता दिनेशसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवगाव येथील सहा.अभियंता दिनेशसिंग राजपूत यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, रुई ग्रामपंचायतीकडे नळ पाणीपुरवठा योजनेचे तब्बल ५ लाख ३२ हजार ६५० रु. व २ लाख ५४ हजार २१० रुपये थकीत बिल असल्याने सदर ग्रामपंचायतला वारंवार कळवूनही ग्रामपंचायत बिल भरत नसल्याने आम्ही आमचे सोबत कर्मचारी धीरज वैभव जोशी, किरण नामदेव पानसरे, समाधान दगू तनपुरे असे आज दि. २७ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ग्रामपंचातीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिर, कोळगाव रोड, कालव्याजवळ, रुई शिवार येथे जाऊन नळ योजनेचे वीज कनेक्शन सहकाऱ्यांमार्फत कट केले. सदर ठिकाणी गावातील उपसरपंच सविता केदारनाथ तासकर व त्यांचे पती केदारनाथ देवराम तासकर दोघे रुई ता.निफाड हे माझ्या जवळ आले व मला म्हणाले की, तुम्ही आमचे गावात येऊन फोलवर चढून वीज कनेक्शन का कट केले? अशी कुरापत काढून मला व माझ्या सहकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करून तुमचे तंगडे तोडतो असे बोलले. मी त्यांना समजावून सांगितले की, आम्ही वारंवार तुम्हाला सांगितले की वीज बिल भरून टाका तरी तुम्ही भरले नाही म्हणून आम्ही कारवाई केली आहे. त्यानंतर केदारनाथ तासकर आमचे वरिष्ठ उपकार्यकारी अभियंता सोनवने साहेब यांच्याशी फोनवर बोलले. सोनवणे साहेबांनी मला ते शुक्रवारी पैसे भरणार आहेत त्यांचे कट केलेले कनेक्शन पुन्हा जोडून द्या असे फोनवर सांगितल्याने मी सहकार्यांमार्फत तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडून दिले. त्यानंतरही सविता केदारनाथ तासकर यांनी आम्हाला शिवीगाळ, दमदाटी करून माझे सहकारी धीरज वैभव जोशी यांचे कानामागे हाताचे चापटीने मारहाण केली. आम्ही तेथून निघून जात असताना केदारनाथ तासकर यांनी आमच्या गाडीला आडवे येऊन आम्हाला सदर ठिकाणावरून जाण्यास प्रतिबंध केला, तसेच तुम्ही पुन्हा कसे येता, पोलवर कसे चढता असे बोलून शिवीगाळ व दमदाटी केली आहे. तिथे उपस्थित असलेले भागवत नंदू वाघ यांनी केदारनाथ तासकर यांना बाजूला करून आम्हाला जाऊन दिले. म्हणून माझी वरील लोकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला अशी फिर्याद आहे.

देवगाव येथील सहाय्यक अभियंता दिनेशसिंग राजपूत यांच्या लेखी फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १४५/२२ भा.द.वि. कलम ३५३,३४१,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दि.२७-७-२०२२,२३/१७ स्टेशन डायरी नं.१८/२२ अन्वये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी लासलगावचे सहा.पो.निरीक्षक राहुल वाघ, पो.उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे, स.पो.उपनिरीक्षक लहानु धोक्रट, पोलीस नाईक संदीप शिंदे, पोलीस नाईक औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहेत.

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

1 hour ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

1 hour ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

1 hour ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 hour ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

2 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

2 hours ago