| *डॉ. संजय धुर्जड.* सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक. आपल्या घरात लहान मूल असले की आपल्याला त्यांचा लळा लागलेला असतो. त्यांना केव्हा उचलून घेतो आणि कवटाळतो असे होते. अशाच मोहापाई आपण लहान मुलांना उचलतांना सहजपणे त्यांचे दोन्ही चिमुकले हात आपल्या हातात धरून उचलतो आणि कवटाळतो. उताणे झोपलेले असतांना, रांगणाऱ्या बाळाला उचलतांना असे होते. किव्हा चालायला शिकणाऱ्या बाळाचा एक हात धरून चालताना अचानक बाळाचा तोल गेल्यावर हात ओढला जातो आणि बाळ रडायला लागते. ते आपल्या हाताला हात लावू देत नाही, कुणाकडे जात नाही, स्वतःचा हात उचलत नाही. असे कधीतरी आपल्या मुलांच्या बाबतीत घडले असेल, तर समजावे की त्यावेळी तुमच्या बाळाला पुल्ड एल्बो झाला असेल. कोपऱ्याच्या सांध्याची ही आणखी एक व्याधी, जिच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. होय, पुल्ड एल्बो. नाव वाचूनच तुम्हाला अंदाज आला असेल की कोपऱ्याचा सांधा खेचला जाणे, म्हणजेच पुल्ड एल्बो. परंतु, फक्त लहान मुलांमध्येच हा प्रॉब्लेम होऊ शकतो असे नाही तर प्रौढांमध्येही हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तो नेमका कसा होऊ शकतो, यासोबत आणखी काय काय इजा होऊ शकते, लक्षणे काय असतात, उपाय काय आहेत, आणि अशी इजा होऊ नये म्हणून काय करावे, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी काही मूलभूत बाबी समजून घेणे आवश्यक आहे, तसेच सांध्याची रचना जाणून घ्यावी लागेल. आपल्या कोपऱ्यापासून ते मनगटापर्यंत दोन हाडे असतात. एक मोठे रेडियस आणि दुसरे छोटे अलना. हे दोन्ही होते कोपऱ्याच्या संध्यात दंडाच्या हाडाशी जोडलेले असतात व मनगटात छोट्या हाडांशी. तसेच ते दोन्ही टोकांना एकमेकांशी देखील जोडलेले असतात. जेव्हा हाताला किव्हा पंजाला धरून खेचले जाते तेव्हा मोठे हाड (रेडियस) ताणले जाते. अशाने रेडियसचे कोपऱ्याजवळील टोक जागेवरून सरकते. त्यामुळे त्याच्याभोवती असलेली लिगामेंट आणि सांध्यांचे आवरण असलेली कॅप्सूल तुटते. रेडियस आणि अलना यांतील संधाही ताणला जातो. असंच काहीसं पुल्ड एल्बो मध्ये होतं. कोपऱ्याचा सांधा सरळ रेषेत ओढले जातात, तेव्हा ही कॅप्सूल आणि लिगामेंट ताणली जाते. ताण कमी असेल तर कॅप्सूल आणि लिगमेंटचे काही तंतू तुटतात, पण त्यांची अखंडता अबाधित राहते. परंतु जेव्हा ताण खूप जास्त असते तेव्हा कॅप्सूल फाटते आणि लिगमेंटचा काही भाग अथवा पूर्ण लिगामेंट तुटते. विशेष करून बेसावध अवस्थेत सांध्याभोवतीचे स्नायू सुस्थावस्थेत असल्यामुळे संपूर्ण ताण कॅप्सूल आणि लिगामेंट वर येतो आणि इजा होण्याची शक्यता वाढते. लहान मुलांचे हात ओढले जातात तेव्हा कोपऱ्याचा सांधा ताणला जातो. उंचावरून पडतांना जेव्हा आपण एखादी वस्तू धरण्याचा प्रयत्न करतो तेव्हाही असंच काहीसं होतं. हात वस्तूवर स्थिरावण्याच्या प्रयत्नात शरीराचे वजन आपल्याला खाली खेचते आणि याचा ताण सरळ अवस्थेत असलेल्या कोपऱ्याच्या सांध्यावर पडतो व तो ताणला जातो. कोपऱ्याच्या संध्यात वेदना झाल्याने बाळ रडायला लागते. कोपऱ्याचा सांधा हलवल्यास वेदना वाढतात, म्हणून ते बाळ आपल्याला हात लावू देत नाही. कोपऱ्याभोवती सूज दिसू लागते व हालचाल बंद होते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. फ्रॅक्चर अथवा पुल्ड एल्बोचे निदान करण्याकरिता डॉक्टर एक्स-रे करतात. फ्रॅक्चर असल्यास एक्स-रे द्वारे निदान होते. परंत, एक्स-रे नॉर्मल वाटत असला तरी पुल्ड एल्बोची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी हाडांच्या तज्ञ डॉक्टरांना दाखवणे गरजेचे असते. बऱ्याचदा याकडे किरकोळ दुखापत आहे असे समजून दुर्लक्ष केले जाते. मग घरगुती इलाज करून तेल, लेप, मलम लावून मालिश केली जाते. वेदनाशामक औषध देऊन बरं होतं का, अशा आशेवर राहण्यात वेळ जातो. मालिश केल्याने सूज वाढते, वेदना वाढतात. कालांतराने सांधा जाम (स्टीफ) होतो आणि हालचाली कमी होतात. पुल्ड एल्बोचा उपाय साधा आणि सोप्पा असतो. ताणलेल्या किव्हा तुटलेल्या कॅप्सूल आणि लिगामेंटच्या जखमा भरण्यासाठी त्याला आराम देणे आवश्यक असते. इजा गंभीर स्वरूपाची असल्यास MRI ची तपासणी करून कॅप्सूल, लिगामेंट आणि स्नायूंच्या दुखपतीची तीव्रता बघितली जाते. सौम्य ते मध्यम स्वरूपाची इजा असल्यास तीन ते चार आठवडे प्लास्टर लावून कोपऱ्याच्या सांध्याला आराम दिला तरी पुरेसे असते. त्यासोबत वेदनाशामक औषधे, सूज कमी करण्याची औषधे तसेच जखम भरण्यासाठी लागणारे मल्टि व्हिटॅमिन्स व टॉनिक ची औषधे दिली जातात. इजा गंभीर स्वरूपाची असल्यास, किव्हा प्लास्टरच्या उपचाराला दाद मिळत नसेल तर ऑपरेशन करून कॅप्सूल आणि लिगामेंट रिपेअर कराव्या लागतात. Attachments area
| |
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik