सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरात बांगलादेशी महिला एका पुरुषासोबत राहत असल्याची खात्रीशीर मिळाली. त्यानुसार गुन्हेशाखा युनिट क्र. 2 च्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे कारवाई करत तीन बांगलादेशी नागरिक व एका स्थानिक व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, सपोनि प्रवीण माळी यांच्या पथकाला संबंधित बांगलादेशी महिला 2017 मध्ये मामाच्या मदतीने अवैधरित्या भारतात आली होती. नंतर फेसबुकवर ओळख होऊन एका पुरुषासोबत तिचे संबंध निर्माण झाले. ती गर्भवती राहिल्यानंतर 2018 साली बाळंतपणानंतर ती भारतात परत आली. त्यानंतर अनेक वेळा ती व तिचा साथीदार बांगलादेश आणि भारतात ये-जा करत होते. अखेरीस 2022 मध्ये संबंधित पुरुषाने बांगलादेशात जाऊन धर्म व नाव बदलून तिच्याशी विवाह केल्याची माहिती मिळाली होती.
तपासादरम्यान असेही उघडकीस आले की, या जोडगोळीने संगनमताने त्यांच्या मुलीचा बनावट जन्म दाखला तयार करून महिलेचे बनावट आधारकार्ड, मतदान कार्ड व पॅनकार्ड बनवले होते. विशेष म्हणजे, या महिलेने भारतात मतदानदेखील केल्याची कबुली दिली आहे.
ही महिला भारतात प्रथम येताना मामाच्या मदतीने आली होती. तपासात हेही समोर आले की, तिचा मामा आणि मामीदेखील भारतात अवैधरित्या राहत होते. त्यांना शिक्रापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ 1) डॉ. किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वपोनि डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कामगिरीत गुन्हे शाखा युनिट क्र. 2 कडील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, प्रवीण माळी, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, मनोहर शिंदे, वाल्मीक चव्हाण, महेश खांडबहाले, तेजस मते, संजय सानप, समीर चंद्रमोरे, अतुल पाटील, मोहन कुवर, दीपक पाटील, पोलीस हवालदार एन. एस. निकम, पोलीस नाईक ममता धूम, पोलीस अंमलदार कोमल आव्हाड, बी. बी. ठाकरे, वैशाली घरटे, सूरसाळवे, प्रवीण वानखेडे, पोलीस अंमलदार सुनील खैरनार, जितेंद्र वजिरे आदींचा सहभाग होता.