शिवीगाळ प्रकरणी आमदार सुहास कांदे यांच्यावर गुन्हा दाखल

शिवीगाळ प्रकरणी आमदार सुहास कांदे यांच्यावर  गुन्हा दाखल

मनमाड : अमिन शेख

-दोन दिवसांपूर्वी समीर भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांना भर सभेत फोनवरून धमकी दिल्या प्रकरणी तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात आलेल्या समीर भुजबळ यांचे समर्थक विनोद शेलार यांना तेथे मीडियासमोर शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी आमदार सुहास कांदे यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा विनश शेलार व शेखर पगार यांच्या तक्रारीवरून दोन विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे गुन्हे दाखल झाल्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे
विधानसभा निवडणूक लागण्याच्या आधीपासूनच आमदार सुहास कांदे व माजी खासदार समीर भुजबळ तसेच छगन भुजबळ यांच्यात मोठ्या प्रमाणावर शीत युद्ध सुरू झाले आहे.  जसजशी निवडणूक जवळ आली तसतसे आरोप प्रत्यारोप सुरू  झाले आहेत.  आमदार कांदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 28 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या सभेत लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार हे समीर भुजबळ यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी आमदार कांदेविरोधात जोरदार भाषणही केले भाषण संपताच लागलीच सुहास कांदे यांनी शेखर पगार यांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच धमकीही दिली यावेळी शेखर पगार यांनी त्यांना आलेला फोन समोर बसलेल्या जनसमुदायाला माइक द्वारे ऐकवला. हे झाल्यानंतर समीर भुजबळ कार्यकर्त्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गेले होते यावेळी त्यांचे असलेले समर्थक विनोद शेलार व त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील आमदार सुहास कांदे यांनी  शिवीगाळ करत समीर भुजबळ यांना देखील शिवी दिली तसेच विनोद शेलार यांना देखील यावेळी धमकी दिली या नांदगाव तालुक्यात माझी दहशत आहे आणि ती कायम राहील हे जाऊन सांग असेही आवर्जून सांगितले. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस समाप्त झाल्यानंतर रात्री उशिरा विनोद शेलार व शेखर पगार यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याप्रकरणी जीवे ठार मारण्याची धमकी देण्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे आमदार कांदेंवर गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून याबाबत नांदगाव तालुक्यात तसेच  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *