मनमाड: आमिन शेख
– मनमाड नांदगावं महामार्गांवर पानेवाडी जवळ दोन दुचाकीला टॅंकरने दिलेल्या धडकेत दोन लहान मुलासह तीन जण ठार तर एक लहान मुलगा व दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे त्यांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन गंभीर जखमींना मालेगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. मयत झालेले जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मनमाड नांदगाव महामार्गावर दोन मोटारसायकला टॅंकर क्रमांक एम एच 16 सी सी 5524 ने धडक दिली या अपघातात दोन लहान मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला तर एक लहान मुलगा व दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तर गंभीर जखमींना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपघाताची भीषणता इतकी होती की दोन्ही मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व मनमाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पुढील तपास पोलीस करत आहेत.