नाशिक

मयूरच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

साथीदाराने मद्यधुंद अवस्थेत चालकाला चिथावले

पंचवटी : प्रतिनिधी
पेठ रोडवरील तवली फाटा परिसरात रविवारी दुपारी एका भरधाव स्कॉर्पिओने 15 वर्षीय मयूर भोये यास चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले चालक आणि त्याचा साथीदार दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश देवराम भोये (40, रा. लक्ष्मीनगर, तवली फाटा) यांचा मुलगा मयूर हा रविवारी (दि. 22) दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास राज बेकरीसमोरील रस्त्याच्या कडेला उभा होता. यावेळी दिंडोरीहून नाशिकच्या दिशेने येणारी स्कॉर्पिओ (एमएच15-केके 6464) भरधाव आली. चालक अमोल रमेश ढगे (रा. रासेगाव) आणि त्याचा साथीदार गणेश उत्तम पेलमहाले (रा. चाचडगाव) हे दोघे गाडीतच दारू पीत होते.
पोलीस तपासात समोर आले की, आरोपी गणेश पेलमहाले याने दारूच्या नशेत चालक अमोलला गाडी अधिक वेगाने चालवण्यासाठी चिथावणी दिली. यामुळे अमोलने रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता वाहन चुकीच्या दिशेला नेले आणि थेट रस्त्याखाली उभ्या असलेल्या मयूरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मयूरचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन जोशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

a-case-of-culpable-homicide-has-been-filed-in-the-death-of-mayur

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

6 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

7 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago