नाशिक

हरित कुंभसाठी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याचा स्तुत्य उपक्रम

नाशिकरोड : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला ’हरित कुंभ’ बनवण्यासाठी नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अर्विन तळपे याने ‘वेष्टन बँक’ या संकल्पनेद्वारे कचरा व्यवस्थापनाचा एक नवा वस्तुपाठ मांडला आहे. वेष्टन बँकेत करू या वेष्टन गोळा, हरित करूया नाशिक कुंभमेळा असा नारा देत त्याने या मोहिमेला सुरुवात केली आहे.
काय आहे ’वेष्टन बँक’?
सामान्यतः आपण ओला आणि सुका कचरा असे दोनच प्रकार मानतो. मात्र, चिप्सचे वेष्टन, चॉकलेटचे कागद, प्लास्टिक रॅपर्स हे सुक्या कचर्‍यात असूनही सहजासहजी रिसायकल होत नाहीत. हेच वेष्टन गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ’वेष्टन बँक’ ही संकल्पना अर्विनने मांडली आहे.
क्षेत्रभेट आणि जनजागृती
अर्विनने पंचवटी परिसरातील रामकुंड व परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कचर्‍याच्या स्थितीचा आढावा घेतला. तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी प्लास्टिक मुक्ती किती गरजेची आहे, यावर पंचवटीतील पुरोहितांशी चर्चा केली. स्थानिक नागरिक व दुकानदार: पर्यटकांना प्लास्टिक कचरा न करण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल शाळेत प्रतिज्ञा व इतर महानगरपालिका शाळेत विद्यार्थांना प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यशाळा – प्लास्टिक पुनर्वापर कार्यशाळा घेण्यात आली. येत्या कुंभमेळ्यात लाखो भाविक नाशिकमध्ये येतील. अशा वेळी खाऊची पाकिटे आणि प्लास्टिक वेष्टनांचे ढीग साचण्याची शक्यता असते. जर प्रत्येक नागरिकाने हे वेष्टन ’वेष्टन बँकेत’ जमा केले, तर गोदावरी प्रदूषण रोखण्यास मदत होईल. शहराच्या सौंदर्यीकरणात बाधा येणार नाही. यासाठी त्याला मुकेश ठोंबरे, वसंत पैठणकर, वडील अंकुश तळपे आणि शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. एका छोट्या विद्यार्थ्याने सुरू केलेली ही ’बँक’ आगामी कुंभमेळ्यात नाशिकला स्वच्छ ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास शालेय समिती अध्यक्ष रावसाहेब गायधनी,प्राचार्य उमाकांत वाकलकर, उपमुख्याध्यापक संजय पाटील, पर्यवेक्षक श्रावण सूर्यवंशी, गजानन होडे यांनी व्यक्त केला आहे.

A commendable initiative by a student of Purushottam English School for Harit Kumbh

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago