उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज उसळणार इच्छुकांची गर्दी

नाशकात भाजपा स्वबळावर लढण्याची शक्यता

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज आणि उद्या शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यात जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे. त्यात राष्ट्रवादीचेही अजून काही ठरत नाही. काल शिंदे शिवसेनेत पंचवटी भागातील काही कार्यकर्त्यांनी तसेच माजी नगरसेविका कविता कर्डक यांनी प्रवेश केला. भाजपाने शंभर प्लसचा नारा दिला असून प्रारंभी महायुतीचे शंभर प्लस म्हणत असले तरी ऐनवेळी भाजपा स्वबळावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेचे गुर्‍हाळ अजून काही संपण्यास तयार नाही.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अवघी दोन दिवसांवर आली आहे. आज आणि उद्या त्यामुळे उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अजून एकाही पक्षाने उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी यादी उशिरा जाहीर करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपा आणि शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती न झाल्यास भाजपा स्वबळावर लढू शकते.

A crowd of aspirants will gather today to fill their nomination papers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *