सुदैवाने जीवितहानी नाही
नाशिक : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वार्यामुळे शहरात आणि परिसरात मोठा प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीतील माती सैल होऊन शहरात अनेक ठिकाणी महाकाय वृक्ष मुळासकट उन्मळून रस्त्यावर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, काल दुपारी 12.30 च्या सुमारास सिडको येथील सेंट्रल पार्क(पेलिकन पार्क)मधील महाकाय असे निलगिरीचे झाड थेट रस्त्याच्या बाजूने मुळासकट रस्त्याच्या पलीकडे घरांवर कोसळले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घराचे व शेडचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून, रस्त्यावरील वाहतूक 4-5 तास पूर्णपणे बंद होती. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या उद्यान विभाग, अग्निशामक दलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कटरच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या कापून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. सुमारे तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले.
A eucalyptus tree fell in Central Park.