‘टाकाऊपासून टिकाऊ’ उपक्रमातून कचरा संकलन गाड्या पुन्हा सेवेत
सिन्नर : प्रतिनिधी
जुन्या वाहनांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून त्यांचा पुन्हा वापर करण्याचा उपक्रम सिन्नर नगरपरिषदेने हाती घेतला आहे. ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेतून दोन ते तीन लहान कचरा संकलन गाड्या आणि दोन ते तीन ट्रॅक्टर दुरुस्त करून सेवेसाठी सज्ज करण्यात आले आहेत. या वाहनांचे पूजन नगराध्यक्ष विठ्ठलराजे अशोक उगले यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील दैनंदिन कचरा संकलन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषदेच्या जुन्या वाहनांची दुरुस्ती, आवश्यक देखभाल आणि रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे वापरात नसलेल्या किंवा दुरुस्तीची गरज असलेल्या वाहनांचा पुन्हा उपयोग करता येणार आहे. नव्या वाहनांच्या खरेदीवरील खर्च कमी करण्यासोबतच उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करण्यास या उपक्रमामुळे मदत होणार आहे.
शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहनांची उपलब्धता महत्त्वाची असते. त्यादृष्टीने जुन्या वाहनांना नव्याने कार्यरत करून कचरा संकलनाच्या कामाला बळ देण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे. खर्चात बचत आणि संसाधनांचा पुनर्वापर या दोन्ही बाबींना या उपक्रमातून प्राधान्य देण्यात आले आहे.
यावेळी आरोग्य सभापती ललिता दत्ता हांडे, नगरसेवक सुदर्शन नाईक, विलास जाधव, सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे, आरोग्य विभागप्रमुख मनोज बोरसे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
A fresh look for old vehicles; Sinnar Municipal Council saves on costs!
- अनिल उदावंंत नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सवात गरबा खेळायला आलेल्या महिलेने घातलेला बॅकलेस ब्लाउज समाजमाध्यमावर…
- अफजल पठाण रस्त्यावर निघताना स्वप्नं असतात घरी परतण्याची, पण भीती असते वाटेतच आयुष्य संपण्याची…
आयकरदाते, सरकारी कर्मचार्यांच्या कुटूंबांचा समावेश; रेशनकार्ड मात्र सुरूच, आरोग्य योजनांचा लाभही मिळणार सिन्नर : प्रतिनिधी…
तातडीने भरपाई देण्याची शेतकर्यांची मागणी निफाड : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील सिद्धपिंप्री येथील शेतकरी शिवाजी नथू…
73 ग्रामपंचायतींत 163 बंधारे; सहा कोटी सात लाख लिटर जलसाठा ♦ पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची…