तातडीने भरपाई देण्याची शेतकर्यांची मागणी
निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील सिद्धपिंप्री येथील शेतकरी शिवाजी नथू ढिकले आणि त्यांचे पुत्र किरण यांच्या डाळिंबबागेचे महावितरणच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे 100 टक्के नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या विजेच्या तारा ढिल्या झाल्याने आणि वार्यामुळे एकमेकांवर घासल्या गेल्याने शॉर्टसर्किट होऊन बागेला आग लागली. या दुर्घटनेत संपूर्ण डाळिंब बाग जळून खाक झाली असून, शेतकर्याचे अतोनात नुकसान झाले आहे. जळालेली ही डाळिंब बाग तीन वर्षांची होती. डाळिंब बागेचे सरासरी आयुष्य सुमारे 10 वर्षे धरले, तर शेतकर्याने केलेली मोठी गुंतवणूक, पुढील अनेक वर्षांचे अपेक्षित उत्पन्न आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार एका क्षणात उद्ध्वस्त झाला आहे. ढिकले कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. महावितरणने घटनास्थळाची पाहणी करून प्रशासकीय निष्काळजीपणाची चौकशी करावी. तसेच महसूल, कृषी विभाग आणि महावितरण यांनी संयुक्त पंचनामा करून नुकसानीची अचूक नोंद घ्यावी. झालेली मूळ गुंतवणूक आणि नियमानुसार पात्र असणारे पुढील उत्पन्नाचे नुकसान विचारात घेऊन शेतकर्याला तातडीने 100 टक्के भरपाई द्यावी.
महावितरण कंपनीने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.
– शंकरराव ढिकले, जिल्हा कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना
Fire breaks out in pomegranate orchard due to short circuit in Siddha Pimpri
- अनिल उदावंंत नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सवात गरबा खेळायला आलेल्या महिलेने घातलेला बॅकलेस ब्लाउज समाजमाध्यमावर…
- अफजल पठाण रस्त्यावर निघताना स्वप्नं असतात घरी परतण्याची, पण भीती असते वाटेतच आयुष्य संपण्याची…
‘टाकाऊपासून टिकाऊ’ उपक्रमातून कचरा संकलन गाड्या पुन्हा सेवेत सिन्नर : प्रतिनिधी जुन्या वाहनांची दुरुस्ती आणि…
आयकरदाते, सरकारी कर्मचार्यांच्या कुटूंबांचा समावेश; रेशनकार्ड मात्र सुरूच, आरोग्य योजनांचा लाभही मिळणार सिन्नर : प्रतिनिधी…
73 ग्रामपंचायतींत 163 बंधारे; सहा कोटी सात लाख लिटर जलसाठा ♦ पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची…