नाशिक :प्रतिनिधी
एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमार्फत महिलांसाठी भव्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर एसएमबीटी हॉस्पिटल नंदी हिल्स धामणगाव (ता. इगतपुरी) व नाशिक शहरातील मुंबई नाका येथील एसएमबीटी क्लिनिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. येत्या 23 जानेवारीपासून या शिबिरास सुरुवात होणार असून 28 जानेवारीपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी प्रतिबंधात्मक तपासणी करून घ्यावी असे आवाहन हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे.
या शिबिरात स्रीरोग तज्ञ डॉक्टरांची टीम आलेल्या महिलांची तपासणी करणार आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत पॅप स्मीयर टेस्ट व स्तनांची सोनोग्राफी म्हणजेच मॅमोग्राफी केली जाणार आहे.
रुग्णांनी अधिक माहितीसाठी +91 91450 01630 क्रमांकावर संपर्क साधावा किंवा एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाव आणि नाशकातील एसएमबीटी क्लिनिकला भेट देऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…