कुठला खजिना सापडला की लॉटरी लागली? मला ना, नक्की कशाचा आनंद होतोय किंवा का इतकं सकाळपासून छान वाटतंय? नक्की असं झालं तरी काय?
मग जरा माईंड रिव्हर्स करत करत दिनक्रम आठवून बघितला आणि नजरेत भरलेला तिच्या चेहर्यावरचा आनंद माझ्या आनंदाचं कारण होता.
हो खरंच! तेच कारण होतं ,समजलं मला.
कसंय ना आपल्या एखाद्या कृतीने समोरची व्यक्ती सुखावत असेल तर तिच्या दुप्पट सुख आपण अनुभवत असतो.
तर झालं असं, घरी चालू अवस्थेत जुना फ्रिज होता आमच्यासाठी अडगळच म्हणून घरी काम करणार्या सोनूला विचारलं तुला फ्रिज हवाय का? पण फुकट देणार नाही, काहीतरी नावापुरती किंमत तुला द्यावी लागेल .
जर आपण कुणाला कुठल्याच परिश्रमाशिवाय किंवा किमतीशिवाय एखादी वस्तू दिली तर ती समोरच्याला निकामी वाटते. म्हणून नावापुरती अतिशय क्षुल्लक रक्कम तिला सांगितली.
दुसर्या दिवशी सोनू तिच्या भावाला आणि नवर्याला सोबत घेऊन आली आणि फ्रिज उघडून ,लावून दाखवू लागली …तिघांमध्ये भाऊ जरा हुशार होता त्यानी जनरल माहितीच्या आधारे विचारलं ताई बर्फ होते का याच्यात?
मी म्हटलं हो , तरीपण सोनू आता आली आहे तर तिलाच पाणी ठेवून शंका दूर करायला लावते त्यानंतर ठरवा.
आमचं संभाषण सुरू असताना सोनू फ्रिजच्या चौफेर फिरून हात फिरवून गोड गोड हसत होती. डोळ्याच्या पणत्या दिवाळीच्या आधीच कुठल्यातरी आत्मिक समाधाने उजळल्या होत्या.
आमचं बोलणं संपल्यावर ती बाहेर पोर्चमधे निवांत भिंतीला टेकून बसली आणि नवर्याला म्हणाली जा रिक्षा घेऊन या पैशाचं मी पायतो, ताई पैसे पगारात कापून घ्या, फ्रिज आताच घरी घेऊन जातो आम्ही
तिचं ऐटीत बसून प्रचंड आत्मविश्वासनं बोलणं किंवा नवर्याला आताच रिक्षा आणायला सांगणं, कुठल्या तरी मुलुखाच्या राणीने फ़रमान सोडावं अगदी तसंच वाटलं मला, तिने चॉइस केलेली वस्तू तिच्या मर्जीने तिच्या पैशाने घेतलेली म्हणजे ती खरोखर राणीच, अधिकार, मी फक्त बघत होते , तिच्या वागण्या, बोलण्यातली श्रीमंती.
अधिकार, निर्णय स्वातंत्र्य, आत्मविश्वास सगळ्याच बाबतीत ती आपल्यापेक्षा सरस वाटली.
रिक्षा आल्यावर ती मागेमागे जात होती आणि फक्त सूचना देत होती, अय दादा पायर्या उतरताना भिंतीले लागू देऊ नको पायजो बापा..
हं… इकडे पलटो आता, आणि मग
मोठ्या दिमाखात फ्रीजला पकडून ती रिक्षात बसून निघून गेली.
एका खोलीच्या घरात फ्रीज कुठे ठेवला त्यात काय काय ठेवलं, दुसर्या दिवशी आल्यावर तिने आधी सगळी गंमत सांगितली.
पोट्टे निव्वळ पाणी ठिऊन बर्फ करून रायले तई नवर्यानं दुधाचं पाकीट पण तिथंच ठेवलं तं, त्याचाई बर्फ झाला इतकं बोलून खळखळून हसायला लागली.
तिची बडबड मी फक्त ऐकत होते ,
आणखी मूठभर आनंद तिच्या हातात ठेवून तिला म्हटलं ,तो फ्रिज तुझ्या घरच्या लोकांसाठी तू घेतलास, ही साडी तुझ्यासाठी मी देतेय
आता मात्र काठोकाठ शिग भरली होती आनंदाची…
A handful of joy
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…