आस्वाद

स्वतःवर प्रेम करणे किती गरजेचे?

प्रेम म्हणजे नक्की काय हो. प्रेमाची काय संकल्पना आहे तुमच्या मनात.कोणत्याही गोष्टीची सुरुवात माणसाने
स्वतःपासून करावी. तसेच प्रेमही माणसाने आधी स्वतःवर करावे तरच आपण दुसर्‍यांवर चांगल्या प्रकारे प्रेम करू शकतो बरोबर ना. स्वतःवर प्रेम करणे हे खूप गरजेचे आहे. कारण ते मानसिक, भावनिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो,स्वतःला प्रेम देतो. तेव्हा आपण आत्मविश्वासाने जगत असतो. नकारात्मक विचारांपासून स्वतःचे संरक्षण करतो. व बरोबरीने इतरांशी चांगले संबंध ठेवू शकतो. स्वतःवर प्रेम का महत्त्वाचे आहे.
1.आत्मविश्वास : स्वतःवर प्रेम केल्याने आपण आपल्या निर्णयांवर आणि कृतींवर विश्वास ठेवतो.
2.नातेसंबंध सुधारतात : जेव्हा आपण स्वतःला प्रेम देतो, तेव्हा आपण इतरांनाही खरे आणि निरोगी प्रेम देऊ शकतो.
3. स्वतःची काळजी : स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती आपल्या आरोग्याची, गरजांची आणि स्वप्नांची काळजी घेते. स्वतःवर प्रेम कसे करावे.-
1.स्वतःला स्वीकारा : आपल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींसह स्वतःला पूर्णपणे स्वीकारा. कोणीही परिपूर्ण नसते हे लक्षात ठेवा.
2.सकारात्मक आत्मसंवाद ः स्वतःशी प्रेमळ आणि प्रोत्साहन देणार्‍या भाषेत बोला. मी पुरेसा नाही असे न म्हणता मी माझ्या मार्गाने प्रगती करत आहे असे म्हणून स्वतःला प्रेरणा द्या.
3.स्वतःसाठी वेळ काढा- आपल्याला आनंद देणार्‍या गोष्टी करा – मग ते पुस्तक वाचणे, व्यायाम करणे किंवा निसर्गात फिरणे असो. इतरांना नाही म्हणायला शिका – स्वतःच्या गरजांना प्राधान्य द्या.
4. चुका माफ करा-स्वतःच्या भूतकाळातील चुका किंवा अपयशांबद्दल स्वतःला दोष देणे थांबवा. त्याऐवजी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम, पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटेल.
5. कृतज्ञता व्यक्त करा- दररोज स्वतःबद्दल किंवा आपल्या जीवनात असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. 6. स्वतःला प्राधान्य द्या –
स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढा. तुम्हाला जी गोष्ट आनंद देते, ती करण्यासाठी वेळ द्या.
या रोजच्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या परंतु तितक्याच उपयुक्त अशा गोष्टी आहेत. म्हणूनच आधी स्वतःवर प्रेम करा. आणि समोर येणारे सकारात्मक बदल स्वतः अनुभवा. असो, आत्ता या क्षणापासून सेल्फ लव्ह व्हेरी इम्पॉर्टंट.

How important is it to love yourself?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago