संपादकीय

एक पोकळी हृदयस्पर्शी

काळजातला लामणदिवा (पुस्तक परिक्षण)

 

पुस्तक- काळजातला लामणदिवा

लेखिका- सौ. सविता दौलत दरेकर

प्रकाशन- परिस पब्लिकेशन, पुणे.

प्रकाशन वर्षे २०२२

मुखपृष्ठ- अरविंद शेलार

मूल्य- ३०० रू.

एकूण पृष्ठ- १३६

 

एक पोकळी हृदयस्पर्शी

 

एका पारिवारिक कार्यक्रमात मला “काळजातला लामणदिवा” ही हृदयस्पर्शी कादंबरी सदिच्छा भेट मिळाली.

मुखपृष्ठ आणि कादंबरीच नाव हे दोन्ही गोष्टी काळजाची उत्सुकता वाढवणारे हृदयाचा ठोका चुकवणारे तर आहेच पण त्याहुनही बापलेकीची ही कथा अंतर मनाला स्पर्श करणारी आहे…

आपल्या आयुष्यात आपण आई किंवा वडील दोघांपैकी कुणा एकाशी आपण जास्त जवळ असतो. दोघांचं व्यक्तीमत्व वेगळे असतं. काही घरांमध्ये आई माया, जीव लावणारी असते तर वडील कडक शिस्तप्रिय असतात. तर काही घरांमध्ये वडील माया करणारे असतात तर आई ही शिस्तप्रिय असते. आपल्या लेकरांवर खरं तर दोघांचही निर्विवाद, निस्वार्थ प्रेम असतंच पण काही वेळा त्यांच्या हितासाठी कठोरही व्हावे लागते. तर काही वेळा प्रेमळ व्हावे लागते.

या कादंबरीत सई चे वडील मुख्य आधार आहे. ही कथा वडीलांनी दिलेल्या आशीर्वादरुपी मंत्राला समर्पित आहे. जो मंत्र प्रत्येक बाप आपल्या लेकीला देत असतो. आणि तो मंत्र प्रत्येक लेकीने जपलाय स्वतः च्याच मनाच्या कुपीत….

आठवणीला ना कुठलेही बंधन असते…

ना आठवणीला कुठलीही सिमा असते…

आठवणीला रंग असतो प्रेमाचा…

आठवणींना गंध असतो भावनांचा…

लहानपणा पासून वडिलांनी दिलेला आशिर्वाद की, *दिल्या घरी सुखी राहा* हा मंत्र ही सई ने पाळला आणि आपल्या वडिलांच्या स्वप्नांना ते या जगात नसताना मोठ्या जिद्दीने, मेहनतीने, विरोध स्विकारून ही पुर्ण केलं….

संघर्ष हा खुप गोष्टींचा असतो. प्रत्येकाला आयुष्यात संकट, अडचणी यांचा सामना करावा लागतो. काही वेळा संघर्ष हा भावनिक असतो. आपल्या प्रिय व्यक्तीच्या विरहाच्या उणीव भासण्याचा त्यांच्या विरहात, त्यांच्याच आठवणींना आधार बनवुन आयुष्यात पुढे जावेच लागते. त्यांच्या बरोबर घालवलेले ते शेवटचे बहुमोल क्षण हे आपल्यासाठी उरलेल्या आपल्याच आयुष्यासाठी त्यांच्याकडून मायेच्या स्पर्शाची, निस्वार्थी प्रेमाची शिदोरीच असते….

त्यांच्या स्वप्नांच्या पुर्तीसाठी आपण संघर्ष करतो. असाच संघर्ष सई ने ही केला आहे. निसर्गाची आवड असणाऱ्या बाबांनी सांगितलेली निसर्गाची किमया, शिकवण तिच्या मनावर बालपणापासूनच पेरली. सईच नातं निसर्गाशी एकरूप झाले.

सई ने तिच्या बाबांनी दिलेल्या स्वप्नांना तिनं तिचं ध्यैय बनवले. शिकुन मोठं व्हावं या ध्यैयापर्यंत पोहचण्यासाठी सईची धडपड ही नदीच्या प्रवाहासारखीच आहे. मार्गात जरी अडथळे आले तरीही तिचा प्रवाह कुणी थांबवू शकले नाही.

काही संघर्ष, दुःख हे आपले एकाकी असतात. ते एकटेपणानेच भोगावे लागतात. विश्वाच्या मालकाशिवाय त्यांचा साक्षीदार दुसरा कुणीही नसतो. आपल्या प्रियजनांचा विरह पचवणं म्हणजे आयुष्यातील आपण गाठलेली पठार अवस्था आहे. त्या पठार अवस्थेत कशाचाही फरक पडत नाही. आपण खुप अमुल्य ठेवा कायमचा गमावला आहे. बस इतकीच काय ती खंत.

मनाला शांतता लाभत नाही….मन एकीकडे आणि शरीर एकीकडे… वडीलांना गमावल्या वर होणारा भावनिक त्रास, चिडचिड, डोक्यातील न थांबणारे विचार मग डोकेदुखी त्यांच्या आठवणी यांत शुन्यात हरवलेली सई कशी बाहेर पडली हे शिकण्यासारखे आहे. सई ने मग जी कुणी व्यक्ती नैराश्याच्या दरीत पडलेली भेटेन, दिसेल. त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचं काम केले.

ती एक प्रेरणा बनली. कुणाचं दुःख आपण नक्कीच वाटुन नाही घेऊ शकत किंवा कमी नाही करु शकत. कारण त्रास काय आहे हे फक्त सहन करणाऱ्यालाच माहित असतं. पण आपण दुःखाशी धीराने संयमानं दोन हात करु शकतो हे नक्की…फक्त आपल्या अवतीभवती सई सारखी व्यक्तीमत्व भेटली तर खरी मैत्रीची दिशा मिळेन …

सईवर खरं तर तिच्या वडीलांनी आणि आईने उत्तम संस्कार, शुध्द आचरण आणि सात्विक विचार मनात पेरले. खरच सई ही तिच्या बाबांनी तिला दिलेल्या मंत्राची त्यांच्या सात्विक विचार, गुणांची उत्तराधिकारी आहे…

*काळजातला लामणदिवा* ही खरं तर प्रत्येक बापलेकीची कथा आहे. प्रत्येक बापलेकीच्या आठवणींना उजाळा आहे. अमुल्य ठेवा आहे. जे आपल आहे तेच वैश्विक आहे. हा आभास वाचताना होतो. या लेखिकेन असंच मोठं व्हावं. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी. या लेखिकेने म्हणजेच सौ. सविता ताई ने अनेकांची प्रेरणा व्हावं आणि असंच गरजवंताच्या दुःखी, अधीर , व्याकुळ मनाला नैराश्याच्या दरीतुन बाहेर काढत प्रेरणा देणार लिखाण करावं हिच अंत:करणातुन मनापासून सदिच्छा…

 

©सौ. श्रध्दा जाधव बोरसे

Ashvini Pande

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

18 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

19 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

19 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

19 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

19 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

20 hours ago